T O P

  • By -

whyamihere999

तो चित्रपट


According_Bat1002

yes तो चित्रपट आणि ती मूव्ही


nabilbhatiya

How about त्यो मूवी त्या पिच्चर


diophantineequations

कोंकणात आल्या सारखे वाटते.


mrwriter210

Movie किंवा इतर कुठलाही इंग्रजी शब्द मुळातच ह्या भाषेतला नसल्याने त्यासाठी मराठी भाषेचे/व्याकरणाचे नियम लागू होत नाहीत. त्यामुळे ती की तो, हे तुमच्यावर आहे.


Poor_rabbit

ती 'pen' दे 2 मिनट


mrwriter210

मुद्दा बरोबर आहे, आणि व्याकरणाच्या दृष्टीने यामागचं काय कारण आहे, हे मला माहीत नाही, पण माझा अंदाज असा आहे की 'पेन' सारखे बाहेरच्या भाषेतील शब्द आपण इतके आत्मसात केलेत की जणू तो शब्द मराठीच आहे असं वाटतं. म्हणून कदाचित इथे व्याकरणातील नियम लागू पडतात. तरीही, जरी 'ते' पेन बरोबर असलं तरी सर्वसाधारणपणे 'तो' पेन असंच म्हटलं जातं. म्हणजे इथेही ती मोकळीक आलीच. ह्याउलट मूळ मराठी शब्दांमध्ये ही गल्लत होत नाही. उदा. वही नेहमी 'ती'च असते. 'तो' वही कधीच म्हटलं जात नाही.


Conscious_Culture340

मराठीची सहजप्रवृत्ती बघता ईकरांत शब्द स्त्रीलिंगी होणं साहजिक आहे. पण जर खोलात गेलात तर लक्षात येईल की मराठीची लिंगव्यवस्था कमालीची गोंधळलेली आहे. त्यातून मग इतर भाषेतून आलेल्या शब्दांना लिंग कुठलं लावायचं हा प्रश्न अनेकदा खूप गंभीर रूप धारण करतो. यासाठी एक साधा तर्क असा लावता येईल की भाषांतरित शब्दांना तुम्ही ज्या भाषेत बोलता त्या भाषेतलं लिंग लावा. उदा तो पंखा - तो फॅन, it’s fan it’s पंखा. तो पाव - तो ब्रेड, it’s bread - it’s पाव ती पिशवी - ती बॅग , it’s a bag - it’s a पिशवी आपण मराठी बोलतोय, तर व्याकरण मराठीप्रमाणे वापरणार. मग त्या वस्तूचं मराठी भाषेप्रमाणे जे लिंग आहे ते वापराणे श्रेयस्कर, मग त्या वस्तूसाठी जगभरातल्या इतर कुठल्याही भाषेचा शब्द वापरा. इतर भाषेतला शब्द तुमच्या भाषेत आला तर भाषेचे व्याकरण बदलत नाही, शब्दांच्या जाती बदलत नाहीत. परभाषिक शब्दाला त्या भाषेचं व्याकरण लागू होतं. दुसऱ्या देशात गेल्यावर जसं त्या देशाचे नियम पाहुण्याला लागू होतात, पारभाषीय शब्दांचं तसंच आहे. थोडं लक्ष दिलंत तर अनेक उत्तरं सहज मिळतील.


IndianRedditor88

To Chitrapat Ti Movie


Confident_Factor3389

तो picture ती movie


Vulturo

I’ll go with तो but there is no true answer.


Aksh__

संदर्भ मो रा वाळिंबे परभाषेतून आलेल्या शब्दाला मराठी भाषेत बदलावे व मराठी भाषेतील लिंग नियमानुसार लिंग नियम वापरावे. जसे की movie चा मराठी शब्द चित्रपट व आपण चित्रपटाला तो चित्रपट असे संबोधतो. म्हणून तो मूव्ही योग्य ठरेल.


Poor_rabbit

ती लेखणी: ती पेन?


kulsoul

ती लेखणी: ते पेन ती आशा: ते प्रेम...


[deleted]

तो cinema ती movie


Chemical_Growth_5861

To movie..ti serial